Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर
    जळगाव

    योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

    Tushar BhambareBy Tushar BhambareDecember 1, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महसूल विभागातील उल्लेखनीय कार्याचा गौरव
    ४ डिसेंबर रोजी नगर येथे पुरस्कार वितरण

    लोकशाही ऑनलाईन डेस्क | जळगाव । नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार जळगांव उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून श्री. योगेश विठ्ठल पाटील यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ माधवराव पाटील यांनी त्यांना पत्र पाठवून पुरस्कारासंदर्भात कळविले आहे.

    रविवार दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी दिड वाजता नगर येथील माऊली सभागृहात या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था या राष्ट्रीय उपक्रमशिल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक तथा राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

    अव्वल कारकून योगेश पाटील हे प्रारंभी महसूल सहाय्यक पदावर रुजू झाले. त्यांना महसूल सहाय्यक पदावर असताना दोन वेळा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. मंडळ अधिकारी बोदवड पदावर कार्यरत असताना सन 2013-14 मध्ये जिल्हास्तरावरील पुरस्कार व सन 2015-16 मध्ये महाराजस्व अभियानामधील उल्लेखनीय कामकाजामुळे ‘उत्कृष्ट मंडळ अधिकारी’म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठीसुद्धा शिफारस करण्यात आली.

    तसेच अव्वल कारकून पदावर कार्यरत असताना तत्कालीन महसूल मंत्री मा. चंद्रकांतजी पाटील यांच्या हस्ते आपणास सन 2016-17 चा ‘उत्कृष्ट अव्वल कारकून’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    जळगाव जिल्ह्याच्या 7/12 संगणकीकरणातील व जुन्या अभिलेख स्कॅनिंगच्या कामकाजाचा आलेख उंचावल्याने त्यांना सन 2017-18 मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली.

    कोरोना संक्रमणातील काळात अडकलेल्या नागरीकांना दिलासा देण्यासाठी ई-प्रवास पासची जबाबदारी यशस्वी पार पाडल्याने त्या कार्याची पावती म्हणून मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव यांनीही सन्मानित केले आहे.

    याची दखल घेत नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात येणार आहे.

    सन 2020-21 मध्ये सदर पुरस्कार गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक व तत्कालीन अपर जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रदान करण्यात आला होता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif