मुंबई
हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्वाची अपडेट्स जारी केली आहे. आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्याच आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे.