Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»पुढील दोन दिवस जळगाव जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’
    हवामान

    पुढील दोन दिवस जळगाव जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

    जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ पावसाची नोंद झाली
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 6, 2026No Comments376 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अश्यात भारतीय हवामान विभागाने आणखी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना वेगवेगळे अलर्ट जारी केले आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यासाठी आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

    जून महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने सुमारे ३२ टक्के तूट निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे ही तूट कमी होऊन आता १९ टक्क्यांपर्यंत आली आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात सरासरी ४० मिमी पावसाची नोंद झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत सरासरी १५४ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत हंगामातील सुमारे ८१ टक्के पाऊस झाला असल्याचे चित्र आहे. पावसाच्या या सुधारलेल्या स्थितीमुळे जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते, मात्र जुलैच्या प्रारंभी झालेल्या दमदार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

    दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार ९ जुलैनंतर जिल्ह्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता असून, या काळात केवळ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा सर्वाधिक परिणाम ऑगस्ट महिन्यात जाणवू शकतो. त्यामुळे त्या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, जुलै महिन्यातील पावसाची स्थिती आणि त्याची सातत्यपूर्ण साथ ही खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif