Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»राजकीय घडामोडी : अतुल पाटील शिवसेना-उबाठामध्ये दाखल ; मशाल चिन्हावर लढणार
    उत्तर महाराष्ट्र

    राजकीय घडामोडी : अतुल पाटील शिवसेना-उबाठामध्ये दाखल ; मशाल चिन्हावर लढणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 13, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राजकीय घडामोडी.अतुल पाटील शिवसेना-उबाठामध्ये दाखल, मशाल चिन्हावर लढणार

    यावल तालुका प्रतिनिधी नगरपालिका निवडणूक तोंडावर असतानाच यावल येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आपल्या सौभाग्यवतीसह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ते आणि त्यांच्या पत्नी या निवडणुकीत मशाल या चिन्हावर लढणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

    यावल येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे लोकसभा प्रमुख अतुल पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जनसंपर्क मोहीम सुरू केली असून ते प्रत्येक मतदाराच्या भेटी घेत आहेत. यंदाचे आरक्षण हे महिला राखीव निघाले असून या जागेवर त्यांच्या पत्नी छायाताई पाटील या रिंगणात उतरणार आहेत. तर स्वतः अतुल पाटील हे वार्ड क्रमांक ११ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते नेमके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार ? हे स्पष्ट झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपली भूमिका अखेर जाहीर केली आहे.

    आज माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आणि त्यांच्या पत्नी छायाताई पाटील या दोन्ही मान्यवरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यामुळे आता ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावल शहरातील नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहणार असून नगरसेवकांच्या जागांमध्ये घटक पक्षांना स्थान देण्यात येणार असल्याचे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #election atul patil Yawa
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif