मित्रांना सांगून तरुणाची विहरीत उडी घेत आत्महत्या
यावल: दहिगाव येथील सोमानंद उर्फ सोनू कमलाकर पाटील (वय २३) या तरुणाने विहरीत उडी घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना १६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

सोनू पाटील हा बसस्थानक परिसरात चहा विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहास मदत करत होता. मात्र, १५ मार्च रोजी त्याने गावाशेजारील किरण नेवे यांच्या शेतातील विहरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.
मित्रांना आधीच सांगितले होते!
आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मित्रांना याबाबत सूचित केले होते, मात्र त्यावर कोणी गांभीर्याने विचार केला नाही. गावात ही चर्चा सुरू आहे की, मित्रांनी वेळीच त्याला रोखले असते, तर त्याचा जीव वाचला असता.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे.


