Thursday, August 11, 2022

बेपत्ता वृध्दाचा मृतदेह आढळला तापी नदीत

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या वयोवृध्दाचा तापी नदीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपचंद शहादू कोळी (तावडे) (वय ६८, रा. निमगाव ता. यावल) असे मृत वयोवृध्दाचे नाव आहे.

- Advertisement -

- Advertisement -

रूपचंद कोळी हे निमगाव येथे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते शुक्रवार १० जून रोजी बाहेर जावून येतो असे सांगून बेपत्ता झाले होते, सोमवारी १३ जून रोजी सकाळी १० वाजता यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथील तापी नदीच्या पत्रात कुजलेल्या अवस्थेत एकाचा मृतदेह आढळून आला होता.

याप्रकरणी यावल पोलीसांनी धाव घेवून पंचनामा केला होता. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेले रूपचंद कोळी यांचाच मृतदेह आल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात  यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी हे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या