हृदयविकाराने आश्रमशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा येथे आश्रम शाळेत एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा असुन या आश्रम शाळेवर रोजंदारी तत्त्वावर कामवर कार्यरत असलेल्या ४० वर्षीय कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.  दरम्यान त्या कर्मचाऱ्यास तातडीने त्याला पुढील उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता, या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती कर्मचाऱ्यास मयत घोषित केले.

या घटनेमुळे वाघझिरा आश्रमशाळेसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वाघझिरा ता. यावल येथे शासकीय आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेमध्ये मयत लुकमान रहेमान तडवी (वय ४०) हा तरुण रोजंदारी कामास होता. दरम्यान कर्तव्यावर असतांना मंगळवारी सायंकाळी त्याला अचानक हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि तो जमिनीवर कोसळल्याने त्याचा मृत्यु झाला. कर्मचाऱ्याच्या अशा मृत्यूमुळे आश्रमशाळेत एकच शोककळा पसरली आहे.  मयत तुकमान तडवी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.