१५ वर्षीय मुलाने झाडाला घेतला गळफास

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेत शिवारात लिंबाच्या झाडाला १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील शिरसाड येथे गुरुवारी  घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाड गावालगत सोहम अरुण महाजन यांचे शेत असून या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने अनिल घुसला पावरा (वय १५) या अल्पवयीन मुलाने गळफास घेतला. हा प्रकार गुरुवारी निदर्शनास आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.

यावल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलाचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आमशा पावरा यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.