विद्यापीठ कर्मचाऱ्याच्या बंद घरातून चार लाखांचा मुद्देमाल लंपास

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्यापीठ कर्मचारी निवासस्थानात कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ३ लाख ९८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र पांडूरंग गायकवाड (वय ५१, रा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी निवासस्थान बांभोरी) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते विद्यापीठात नोकरीला आहे. २४ मे रोजी रात्री ११ ते २५ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील ३ लाख ८९ हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि ९ हजार ५०० रूपयांची रोकड असा एकुण ३ लाख ९८ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी रविंद्र गायकवाड यांनी पाळधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here