हिंदू समाजामधील लग्नाला मुस्लिम बांधवांनी दिले मंदिर भेट

0

यावल, शब्बीर खान, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल येथील सरस्वती विद्या मंदिर जवळील रहिवासी व हल्ली मुक्काम जळगाव जितेंद्र कोळी यांच्या मुलीचा लग्न समारंभ कानळदा येथे संपन्न झाला.

विवाहसाठी मुलीच्या लग्नाला आपण काहीतरी चांगली भेट वस्तू द्यावी. ही संकल्पना मनात ठेवून यावल येथील लाकडाचे व्यापारी शेख फारुक यांनी सुंदर असे लाकडापासून बनवलेले मंदिर भेट दिले.

यावेळेस लग्न समारंभात उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळींनी शेख फारुख शेख यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सदरील विवाहस्थळी यावल येथील कार्यकर्ते सामाजिक गणेश महाजन, प्रकाश बिरारी, छोटूभाई कैलास कोळी यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.