Wednesday, August 17, 2022

धावत्या बसवर वृक्ष कोसळला; १२ प्रवाशी जखमी

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

प्रवाशांना घेवून जाणाऱ्या धावत्या बसवर अचानक वृक्ष कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या अपघातामध्ये १२ प्रवाशी जखमी झाले असून जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

यावल आगाराची बस (क्रमांक एमएच २०, बीएल २५४२) ही आज दुपारी २ वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात असतांना रस्त्यावरील पाटचारीजवळ अचानक मोठे झाड बसवर कोसळले. यात चालकासह १२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात सुरेश पंढरीनाथ महाजन रा. यावल, इच्छाराम टिकाराम राजपूत (वय ७०, रा. सांगवी खुर्द), पंडित लक्ष्मण परणकर (वय ६६ रा. यावल), शकुंतला विलास चौधरी (वय ६०, रा. धानोरा), सुशिलाबाई किसन धनगर (वय ६०, रा. मुक्ताईनगर), जोवरा रशीद खाटीक (वय ५०, रा. आडावद), सुरेश पंढरीनाथ महाजन (वय ५२), पद्माबाई रमेश कोळी (वय ५०), मंगला रामदास चौधरी (वय ५५), कल्पना संतोष चौधरी (वय ५५), दीपक येवलू वानखेडे (वय २४),  नीलम शैलेंद्र पाटील (वय १७) असे १२ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, यावल आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला व डॉ. मनिषा महाजन यांनी उपचार सुरू केले.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या