यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल येथील गट नंबर 9 येथे शंभर वर्षांपासून हिंदू नाथ जोगी समाजाची दफनभूमी आहे. पूर्वीपासून त्या ठिकाणी हिंदू नाथ जोगी समाज हा त्यांच्या समाजातील अंत्यविधी व देह दफन त्याच जागी करत आला आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती आपल्या स्वतःची जागा व मालकी हक्क बजावत असून त्या ठिकाणी ती नगरपालिका झोननुसार ती जागा आरक्षण झोनमध्ये येत आहे. तरी हिंदू नाथजोगी समाजाने आता समाजाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास देह कुठे दफन करावे ? हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरी हिंदू नाथ जोगी समाजाला जोपर्यंत नगरपालिका किंवा प्रशासन नवीन जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत या जागेवर कोणीही आपला दावा करू नये व तिथे कोणत्याही प्रकारचे एन ए प्लॉट किंवा जागेचे साफसफाई करण्यात येऊ नये. हा वाग्रस्त विषय असून हा विषय हिंदू मुस्लिम व कायदा सुव्यवस्था निर्माण करणारा आहे. या समाजाने निवेदनाद्वारे विनंती केलीय की, जोपर्यंत यांच्या समाजाला एक हक्काची दफनभूमी जागा मिळत नाही तोपर्यंत ह्या जागेवर कोणताही प्रकारच्या डेव्हलपमेंट काम होता कामा नये. अन्यथा पुढील काळात याचे परिणाम वाईट होऊन कायदा सुव्यवस्था निर्माण होईल.
तसेच वेळ पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील. अशा प्रकारचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, समाजाचे संजय जोगी, रमेश जोगी, शरद जोगी, शालिग्राम राजपूत, सचिन मोरे, मनोहर जोगी, पांडुरंग जोगी, अनिल जोगी, मयूर जोगी हे समाजबांधव उपस्थित होते.

