Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दुकानाला भीषण आग, १४ लाखांचे साहित्य खाक
    ताज्या बातम्या

    दुकानाला भीषण आग, १४ लाखांचे साहित्य खाक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    मंगळवारी पहाटे दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागातील हरिओम नगरात घडली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने १४ लाखांचे नुकसान झाले. आगीचा फटका शेजारील घराला देखील बसला. शेजारील घराचे खिडकी, दरवाजे देखील जळून ३९ हजारांचे नुकसान झाले. या आगीचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरात फैजपूर रत्यावरील विस्तारित भागातील हरिओम नगरात संजेरी ग्लास हे शेख जाकीर शेख कमरोद्दिन, शेख अत्तमस शेख जाकीर यांचे दुकान आहे. या दुकानाला मंगळवारी पहाटेपूर्वी अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानातील प्लायवूड तसेच अल्युमिनियमच्या खिडक्या, दरवाजे तयार करणारे प्लायवूड कटिंग करणारे तसेच अल्युमिनियम कटिंग करणाऱ्या विविध प्रकारच्या मशिनरी, अल्युमिनियमच्या सीट, प्लायवूडचे शीट, तयार झालेते खिडक्या दरवाजे तसेच काच व फर्निचर जळून खाक झाले. आग लागल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

    यावल नगरपालिकेचे अग्निशामक वाहनचालक कैलास काटकर, फायरमन शाहरुख खाटीक, दिनेश धारू यांनी या ठिकाणी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोवर सर्व साहित्य जळून खाक झाले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी मीना तडवी, तलाठी गजानन पाटील, प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी या ठिकाणी पंचनामा केला. आगीमध्ये दुकानदाराचे १४ लाख, सात हजार रुपयांचे साहित्य जळाल्याचा पंचनामा करण्यात आला. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

    #crime Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif