नात्याला कलंक.. सासऱ्याचा सुनेवर लैगिंक अत्याचार

चाकूचा धाक दाखवून वेळोवेळी..

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावलमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सूनने आपल्या सासऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराची धक्कादायक तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय विवाहित महिला (रा. बाळापूर, जि. अकोला) हिने आपल्या ५६ वर्षीय सासऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. आरोपी सासऱ्याने १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत चाकूचा धाक दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले, असा आरोप सुनने केला आहे.

सुन माहेरी गेल्यावर तिने उरळ, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यामुळे यावल तालुक्यातील राहणाऱ्या सासऱ्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण शून्य क्रमांकाने यावल पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.