यावल आगारात १० नव्या एसटी बस दाखल

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

येथील एसटी आगारात नव्याने १० एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. यावल एसटी आगारात बिगाड झालेल्या नादुरुस्त बसेस संदर्भात विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातुन केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश प्राप्त झाले असून प्रवाशी नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावलच्या एसटी आगारात बहुप्रतिक्षेनंतर प्राप्त झालेल्या नवीन एसटी बसेसचे पुजन करीत नारळ फोडून त्यांचे लोकापर्ण करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हस्ते लोकापर्ण सोहळा पार पडला. पुर्वी आगारात ६१ बसेस होत्या व त्यातील काही बसेस नादुरूस्ती झाल्यानंतर नियमित बसफेऱ्या करीत तारेवरची कसरत करावी लागायची. मात्र आता नविन बसेस मिळाल्याने आगारातील समस्या सुटली आहे.

येथील एस.टी. आगारात परिवहन मंडळाच्या वतीने व रावेर आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नविन १० एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. आगारात दोन टप्प्यात या बसेस दाखल झाल्या व या सर्व नविन बसेस बस लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात भाजपा वैद्यकिय आघाडीचे डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमास सुरवात झाली.

यात भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, वड्री सरपंच अजय भालेराव, भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी, आगार व्यवस्थापक दिलीप महाजन, निलेश गडे सह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हस्ते बस पुजन करण्यात आले. यावल बस आगाराला  महायुती सरकारतर्फे १० नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्याबद्दल आगाराकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.