चुंचाळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल विरावली रस्त्यावर भीषण अपघात झालाय. यावल तालुक्यातील कोरपावली येथील निशा जितेंद्र येवले व विशाल कुशल येवले हे दोघं दुचाकीने यावलच्या दिशेने जात होते. कृषी फलोत्पादन केंद्राजवळ खड्डेमय वळणाचा रस्ता असल्याने समोरून येणाऱ्या स्कूल बसला जोरदार धडक बसली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली.
अपघाताचे ठिकाण हे खड्डेमय आणि वळणाचे असल्याने वाहन चालकांचा ताबा सुटण्याची शक्यता असून यामुळेच ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित यावल पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.