Monday, August 15, 2022

भोरटेक गावाजवळ ट्रक-बसची धडक; ८ प्रवासी जखमी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

ट्रक आणि बस यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना यावल तालुक्यातील भोरटेक गावाजवळ घडली. या अपघातात आठ प्रवाश गंभीर जखमी झाले आहेत.

तालुक्यातील भोरटेक गावाजवळ आज सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान रावेर बस आगाराची बस क्रमांक (एचएच ४० एन ९०६३) ही प्रवासी घेवून जळगावकडून रावेरला जात होती. फैजपूरकडून भुसावळकडे जाणार ट्रक (युपी ८० सीटी ७५३६) हा जात असताना भोरटेक गावाजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या