यावल आगारातील जुन्या बसमुळे प्रवास ठरतोय त्रासदायक

0

यावल आगारातील जुन्या बसमुळे प्रवास ठरतोय त्रासदायक

प्रवासात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले ; मनवेल शिरागड रस्त्यावर प्रवाशांचे हाल

मनवेल ता यावल प्रतिनिधि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बीद वाक्य असले, तरी सध्याच्या अनेक एसटी बसप्रवाशांना सेवा देण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कमी पडत असल्याचे चित्र मनवेल परिसरात दिसुन येत आहे.
यावल आगारातून खेडया पाड्यात जुन्या बसवर चालू असल्याने मनवेल , थोरगव्हाण-शिरागड बसेच नादुरुस्त होऊन प्रवाशांचा वेळ खर्ची होत असल्याचे दिसून येत आहे याकडे महामंडळ लक्ष देणार आहे का? असा सवाल संतप्त प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे.
यावल आगारातील बसेस गेल्या दोन दिवसापासून बंद पडत असल्यामुळे शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षाणिक नुकसान होत आहे. अधिक जुन्या अगदी खिळखिळ्या झालेल्या एस टी बसेस अजूनही रस्त्यावर धावत आहेत. त्या बसेस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
स्टेअरिंगमध्ये बिघाड होणे, गिअर अडकणे, रेडिएटर फुटणे, इंजिन ओव्हर हीट होणे, टायर फुटणे, स्टार्टरमध्ये बिघाड झाल्याने बसला धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट तुटणे आदी प्रकार नेहमीचेच झाले आहेत. तर, अंतर्गत भागातही बसचे सीट तुटलेले, गाद्या फाटलेल्या असणे, खिडक्या फुटणे किंवा नसणे, पत्रा तुटलेला असणे तसेच बसचा आवाजही प्रवाशाच्या कानाला सहन होणार नाही इतका असणे, अशा समस्या जुन्या बसमध्ये येत आहे त्याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे.
सोमवारी यावल आगारातून निघालेली शिरागड बस ही शिरागड गावात बंद पडली तर मंगळवारी पुन्हा सकाळी ७ वाजेची बस साकळी गावाजवळ बंद पडली बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी, या बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना मिळेल त्या बसमधून पुढील प्रवास करावा लागला. हे रोजचे चित्र असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. नादुरुस्त बसमुळे वेळेत प्रवास होत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानाबरोबर मनस्ताप सहन करावा लागत.
महिलांना एसटी मध्ये अर्धे तिकीट तर ७५ वर्षा जेष्ट नागरीकांना मोफत प्रवाश एक वर्षा पासुन एसटी महामंडळाने सुरू केल्याने याला प्रवाशांसह महिलावर्गाने चांगला प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, यावल आगारातून निघणार्‍या बस सुस्थितीत आहेत का? याची शहनिशा होण्याची गरज आहे. नादुरुस्त बसमुळे प्रवाशांसह चालक-वाहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.