Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    • पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»एक अकेला सब पे भारी! यावल निवडणुकीत छाया–अतुल पाटील चर्चेत
    ताज्या बातम्या

    एक अकेला सब पे भारी! यावल निवडणुकीत छाया–अतुल पाटील चर्चेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 1, 2025Updated:December 1, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एक अकेला सब पे भारी! यावल निवडणुकीत छाया–अतुल पाटील चर्चेत

    यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक दारात येऊन ठेपली असून येत्या २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत असताना शहरात प्रचाराची धामधूम शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी व उमेदवार मतदारांच्या दारात जाऊन थेट संवाद साधत आहेत. अशातच यावल शहरात एकच चर्चा जोरदार रंग घेताना दिसत आहे , “एक अकेला सब पे भारी!”

    छाया अतुल पाटील यांचा प्रचार वेगात

    महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार सौ. छाया अतुल पाटील मैदानात आहेत. त्यांच्या पतींमुळे आणि अनुभवी मार्गदर्शनामुळे उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्यांच्या प्रचाराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    छाया पाटील यांच्या पती अतुल पाटील हे माजी नगराध्यक्ष असून, पूर्वी अनेक विकासकामांमुळे त्यांची ओळख शहरवासीयांमध्ये पक्की आहे. मोहिमेच्या दरम्यान घराघरात जाऊन संवाद, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि ठोस आश्वासनांची मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यामुळे शहरात “एक अकेला सोपे भारी” ही घोषवाक्यात्मक चर्चा चांगलीच पकड घेत आहे.

    भाजपकडून कडवे आव्हान

    दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपने देखील सर्वशक्तीनिशी मैदानात झेप घेतली आहे. भाजपकडून रोहिणी उमाकांत फेगडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत.
    त्यांच्या प्रचारासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे काही दिवसांपासून यावल शहरात तळ ठोकून आहेत. याशिवाय मंत्री गिरीश महाजन आणि रक्षा ताई खडसे यांचीही सभा शहरात झाली असून पक्षातील बड्या नेत्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे.
    भाजप संघटनात्मक बळावर आणि विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे.

    तरीही ‘अकेला’चा आवाज बुलंद

    नेत्यांच्या सभा, पक्षीय युती आणि प्रचारयोजनांच्या पार्श्वभूमीवरही शहरातील चर्चेचा सूर वेगळाच आहे. अतुल पाटील यांचा सखोल संपर्क, अनुभवी कामकाज आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यामुळेच नागरिकांमध्ये “एक अकेला सोपे भारी” असा नाद उमटत असल्याचे सर्वत्र चर्चा दिसून येते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    nagar palika election Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif