Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»फैजपूर नगरपालिकेत शतप्रतिशत भाजपची सत्ता येणार – दामिनी सराफ
    जळगाव

    फैजपूर नगरपालिकेत शतप्रतिशत भाजपची सत्ता येणार – दामिनी सराफ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 29, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर नगरपालिकेत शतप्रतिशत भाजपची सत्ता येणार – दामिनी सराफ

    यावल प्रतिनिधी राज्यात येऊ घातलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीचा रणधुमाळी शिगेला पोहोचली असून सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने शहरांमध्ये प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यातच फैजपूर शहरात लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या सौ. दामिनी सराफ यांनी आपला विजय निश्चित असल्याचा ठाम दावा व्यक्त केला आहे.

    दैनिक लोकशाहीशी बोलताना त्या म्हणाल्या की, फैजपूर शहरात प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येक समाजघटकातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे, आणि त्यामुळे आगामी निवडणुकीत नगरपालिकेत शतप्रतिशत भाजपची सत्ता प्रस्थापित होणार असल्याचा राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. “मतदारांनी आम्हाला नगराध्यक्ष पदावर संधी दिल्यास शहराचा चेहरामोहराच बदलेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    भाजपच्या सत्तेची ताकद मांडताना त्यांनी सांगितले की, देशात तसेच राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. “आम्हाला नागरिकांनी निवडून दिल्यास राज्य व केंद्र शासनाकडून भरगच्च निधी आणून फैजपूर शहराचा सर्वांगीण कायापालट करू. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, व्यापारी सुविधा आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती या सर्व आघाड्यांवर आम्ही वेगाने काम करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

    सराफ यांनी विशेषतः शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. “फैजपूरमध्ये अनेक वर्षांपासून काही विकासकामे रखडलेली आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. माझे प्राधान्य म्हणजे — प्रशासनात पारदर्शकता, निधीचा कार्यक्षम वापर आणि प्रकल्पांची वेळेत पूर्तता,” असा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

    प्रचारादरम्यान त्यांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल बोलताना सराफ म्हणाल्या, “आम्ही केवळ घोषणांवर नाही तर ठोस कृतीवर विश्वास ठेवतो. शहरातील सर्व समाजघटकांना भेटत आहोत, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून उपाययोजना आखतोय. या निवडणुकीत मतदार सकारात्मक बदलासाठी मतदान करतील याची मला खात्री आहे.”

    त्यांच्या प्रचारमोहीमेमध्ये भाजपचे कार्यकर्ते, युवा वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असून शहरातील विविध वॉर्डांतून साथ मिळत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकीत फैजपूरकर कोणाला पाठिंबा देतात हे मतपेटीच ठरवेल, मात्र दामिनी सराफ यांचा आत्मविश्वास आणि भाजपची संघटनात्मक ताकद या निवडणुकीत निर्णायक घटक ठरू शकतात.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #bjp #election gaijpur
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif