यावल येथे केळी व्यापाऱ्यावर लांडग्याचा हल्ला

0

यावल शहर प्रतिनिधी
यावल शहरात काही दिवसापूर्वी काळवीट फिरत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडिया वरती फिरत होता त्याच अगोदर साकळी शिवारात बिबट्याने लहान मुलावर हल्ला करून ठार केले होते .या दोन्ही घटनांना महिने उलटत नाही तोवर यावल शहरालगतच्या टेंभी शिवारात एका केळी व्यापाऱ्यावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की इरफान रशीद खान व 52 राहणार बाबा नगर यावल हे केळी व्यापारा संदर्भात आकाश बाळू पाटील यांच्या टेंभी कुरण शिवारातील शेतात दुपारी साधारण १२:३० मिनिटांनी मोटार सायकलने जात होते यावेळी अचानक शेताच्या दिशेने आलेल्या लांडग्याने त्यांच्यावर झडप घालत मोटरसायकलवर हल्ला केला लांडग्याने थेट त्यांच्या छातीवर पंजाब मारून त्यांना जखमी केले मात्र प्रसंगावधान राखत इरफान खान या हल्ल्यातून बचावले या घटनेनंतर लांडगा घटनास्थळावरून पसार झाला आहे

जखमी इरफान खान यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही घटना खूपच भीतीदायक होती व देवाच्या कृपेने मी या घटनेतून बचावलो असे सांगितले परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने तातडीने या भागात उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.