अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रिया संशयास्पद !

यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील गोंधळ : निवड समितीबाबत संदिग्धता

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

चोपडा, रावेर व यावल विधानसभा मतदारसंघात अंगणवाडी सेविका, मतदनीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दैनिकात जाहिरात प्रसिद्ध न करतान भरती होत असून याबाबत लोकप्रतिनिधी देखील अंधारात असल्याचे समोर आले आहे.

तीन तालुक्यात राबविण्‌यात येत असलेली भरती आमदार अमोल जावळे, प्रा. चंद्रकांत सोनवणे व इतर प्रमुख लोकप्रतिनिधींची दिशाभूल करीत वर्तमानपत्रात जाहिरात न देता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीची प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने सुरू असल्याने सर्वसामान्य महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, एकात्मिक विकास सेवा योजनेचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे या जबाबदार महिला अधिकारी असताना सुद्धा महिला अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांची भरती सोईनुसार सुरू आहे. भरती प्रक्रियेत निवड समिती सुद्धा नियुक्त नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यावल पंचायत समिती आवारात एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाचे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून अर्चना आटोळे यांच्ययाकडे कार्यभार आहे. गेल्या आठ वर्षांपासून बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून एकाच महिला अधिकाऱ्याकडे प्रभारी पद असल्याने जिल्ह्यात, तालुक्यात शासकीय स्तरावर अनेकांशी कार्यालयीन शासकीय कामकाजाचे हितसंबंध असल्याने बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याने महिला अंगणवाडी सेविकेच्या 3 जागांसाठी, आणि महिला मदतनीस म्हणून 47 जागांची भरती करण्यासाठी कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात न देता फक्त ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर सूचना देऊन भरती प्रक्रिया सुरू केली.

अर्ज मिळतो झेरॉक्स दुकानावर !

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेबाबत अटी-शर्तीचा अर्ज बघितला असता फॉर्म मिळण्याचे ठिकाण चक्क झेरॉक्स दुकानदारांचे दिले आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून फॉर्म स्विकारण्याची प्रक्रिया पोस्टाने न राबविता प्रत्यक्ष यावल येथील बालविकास प्रकल्प कार्यालयात जमा करण्याची टीप देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका पदासाठी आणि मदतनीस पदासाठी किती महिलांनी फॉर्म भरून कार्यालयात जमा केले याची संख्या सुद्धा कार्यालयातून उपलब्ध झाली नाही.

निवड समितीबाबत संदिग्धता !

भरती प्रक्रिया राबवितांना निवड समिती असणे आवश्यक आहे. मात्र निवड समितीबाबत शासन स्तरावरच संदिग्धता असल्याचे समोर आले आहे. निवड समितीमध्ये आमदार, विविध विभागांचे अधिकारी, महिला प्रतिनिधी यांचा समावेश असतो, मात्र यया समित्या सरकारने बरखास्त केल्याची माहिती प्र्राप्त झाली आहे. निवड समितीच अस्तित्वात नसतांना भरती कशी होते? असा प्रश्न उपस्थित रहात आहे.

 

मतदारसंघात अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती बाबत आपणास कुठल्याही अधिकाऱ्याने माहिती दिलेली नाही. भरती प्रक्रियेबाबत शासनाने कुठले मार्गदर्शक तत्त्व आहे याचा जीआर पाहून अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती संदर्भात सविस्तर माहिती देतो.

– अमोल जावळे

आमदार, रावेर

 

 

यावल, रावेर व चोपडा या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस, सेविका भरती प्रक्रिया सुरु असून या संदर्भामध्ये शासनाने जीआर पारित केलेला आहे. रावेर व चोपडा मोठा मतदारसंघ असून यासंदर्भामध्ये जाहिराती मोठ्या स्वरूपाची होत असून शासनाने जाहिरात कोणत्याही वृत्तपत्राला दिलेली नाही; त्यांनी ग्रामपंचायतीला जीआरची प्रत पाठवलेली आहे आणि गावोगावी दवंडी देण्यास सांगितलेले आहे. शासनाने आजपर्यंत कोणत्याही बाल विकास प्रकल्प अंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरलेल्या नसल्यामुळे तो सर्व कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

– प्रा. चंद्रकांत सोनवणे

आमदार, चोपडा

Leave A Reply

Your email address will not be published.