यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल येथील वनविभागाच्या कारवाईत दि. १२ फेब्रुवारी रोजी वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांचेकडून मिळालेल्या गुप्त बातमीनुसार डोंगर कठोरा शिवारात आडजात लाकुडाची ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.
डोंगर कठोरा परिमंडळ स्टाफ व गस्ती पथक स्टाफ यांनी संयुक्तपणे कारवाई करत सदर ट्रॅक्टर पकडले असून वनपाल डोंगर कठोरा यांनी प्र.री.क्र ०३/२०२५. नुसार गुन्हा नोंदविला आहे. यात ६ घन मीटर लाकूड अंदाजे किंमत ७२oo व ट्रॅक्टर अंदाजे किंमत तीन लाख रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असून भारतीय वन अधिनियम १९२७ व महाराष्ट्र वृक्ष तोड (विनियमन)अधिनियम १९६४ अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही विना परवानगी वृक्ष तोड व त्याची अवैध वाहतूक करू नये, तसेच सदर प्रकार दिसून आल्यास तात्काळ वन विभागाला सूचित करावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सदरील कारवाई ही वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त श्रीमती निनु सोमराज, उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख, मा. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे राजेंद्र सदगिर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्प) यावल समाधान पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व स्वप्नील फटांगरे यांचे नेतृत्वाखाली ही कारवाई कारण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान वन विभागातील कर्मचारी.आर.एम.जाधव, आर.बी थोरात, रवि तायडे यांचा सहभाग होता.