यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल रावेर विधानसभा अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांचा हिंगोणा, सांगवी, बोरखेडा, हंबर्डी, सातोत, कोळवद, बोरावल खुर्द, बोरावल बुद्रुक, अट्रॅवल, टाकरखेडा, डोंगर कोठारा, भालोद, चीतोडा, यावल शहर अशा अनेक गावांमध्ये प्रचार दौरा नुकताच संपन्न झाला.
या प्रचारदौरा दरम्यान अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद जफर मोहम्मद रावेर माजी नगराध्यक्ष यांचा प्रचार रॅलीला ग्रामीण क्षेत्रातून मोठा प्रतिसाद पहावयास मिळत आहे. सर्व समाजातून माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांना सर्व ज्येष्ठ नागरिक अपंग व सर्व स्तरावरून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. रावेर यावल मतदार संघातील शेतकरी कष्टकरी महिला आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा व विकास करण्यासाठी ऑटो रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून मतदारांनी आशीर्वाद देण्याची विनंती केली.
रावेर नगरपालिका या क्षेत्रात सन 1985 पासून नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्ष असे अनेक पदे भूषवले आहेत. त्यांनी 1985 पासून 2024 पर्यंत रावेर शहरांमध्ये वेगवेगळ्या वस्तींमध्ये भरभरून विकास केल्यामुळे रावेर यावल तालुक्यात असाच भरभराट विकास करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला असून आपण सर्व मिळून माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद अपक्ष उमेदवार यांची निशाणी ऑटो रिक्षा या निशाणी चे बटन दाबून यांना भरभराट मतदान करावे.
रावेर यावल विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या दर्जा मिळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे शेत रस्त्यांसाठी परिसरातील औद्योगिक विकासासाठी प्रत्येक तरुणाला रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व रावेर यावल ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आपण सर्व मिळून अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद जफर मोहम्मद यांना गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना विधिमंडळात आपण मतदारांनी घेतलेला पाहिजे व रावेर यावल विधानसभा या ग्रामीण भागात नवीन इतिहास घडविला पाहिजे.
माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद अपक्ष उमेदवार यांनी रावेर यावल मतदारांना आव्हान केले आहे की अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद यांचा विजय नसून रावेर यावल तालुक्यातील सर्व मतदारांचा विजय आहे.