ट्रॅक्टर पलटी झाल्याने चार शेतमजुर जखमी 

एकाची प्रकृती गंभीर

0

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

यावल शिवारात आज सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी मजुर घेवुन जाणारा ट्रॅक्टर पलटी होवुन या अपघातात चार मजुर जखमी झाले असुन एकाची प्रकृती गंभीर झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल शिवारातील प्रमोद नमाडे यांच्या शेतात आज दिनांक १९ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळ ९ वाजेच्या सुमारास शेतीकामासाठी मजुर घेवुन जाणारे ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पलटी झाली.

अपघातात राहुल वासकर बारेला, सागर अशोक, मालकाचे पंडू सालदार बारेला व भुरा भैय्या बारेला हे चार मजुर जखमी झाले असुन या सर्व जखमींना उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रूग्णालयात डॉ. प्रशांत जावळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितम सोमनाथे यांनी त्यांच्यावर तातडीने प्रथमपचार केले. यातील दोन जणांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असुन त्यात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस व नागरीकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमींना मदत केली.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सर्व कायकर्ते तसेच ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे यांच्यासह आदीनी रुग्णांना सहकार्य केले .

Leave A Reply

Your email address will not be published.