खुन्नसने पाहण्यावरून तरुणावर धारदार हत्याराने वार

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तरूणाकडे खून्नसने पाहणे आणि नेहमी घराकडे बघण्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणावर पाच जणांनी धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील डांभूर्णी गावात घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावल पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विजय सुकदेव ठाकरे (वय-२८) रा. वटार, ता. चोपडा ह.मु. डांभूर्णी ता. यावल हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार ३ जूलै रोजी सायंकाळी विजय ठाकरे हा घरी असतांना गावातील पंकज पंढरीनाथ कोळी, विवेक ज्ञानेश्वर कोळी, जीवन वासूदेव कोळी, •सुनिल लिलाधर कोळी आणि मनोज पंढरीनाथ कोळी सर्व रा. डांभूर्णी ता. यावल हे विजयकडे खुन्नसने घराकडे पाहत होत. याचा जाब विजयने विचारला असता पाचही जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर यातील पंकज कोळी याने हातातील धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून कपाळावर जखमी केले. त्याला जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय ठाकरे याच्या जबाबावरून यावल पोलीस ठाण्यात पंकज पंढरीनाथ कोळी, विवेक ज्ञानेश्वर कोळी, जीवन वासूदेव कोळी, सुनिल लिलाधर कोळी आणि मनोज पंढरीनाथ कोळी सर्व रा. डांभूर्णी ता. यावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.