Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»मराठी भाषेचा वटवृक्ष ‘यास्मिन शेख’ काळाच्या पडद्याआड
    शैक्षणिक

    मराठी भाषेचा वटवृक्ष ‘यास्मिन शेख’ काळाच्या पडद्याआड

    १०१ व्या वर्षी पुण्याच्या राहत्या घरात घेतला अखेरचा श्वास
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 24, 2026No Comments106 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्रातील जेष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. त्याच्या निधनाने मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. यास्मिन शेख यांना नुकत्याच झालेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात सन्मानित करण्यात आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्या या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

    मराठी भाषेच्या अभ्यास आणि संवर्धनासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. बालभारतीच्या मराठी विषयाच्या पाठपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने त्यांनी तब्बल 7 वर्षे संपादन केले होते. त्यांच्या पश्च्यात दोन मुली आहेत. डॉ. शमा आणि प्रा.रुकसाना असा त्यांचा परिवार आहे. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मराठीवरील प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन शोकदायी असल्याची भावना व्यक्त करून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

    मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif