यशवंत पवार यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार

0

लोकशाही न्युज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील देवगाव जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक यशवंत धर्मराज पवार यांना सर्वज्ञ फाऊंडेशन दादर पच्शीम मुंबई यांच्या वतीने उत्कृष्ठ राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार सन २०२३ हा मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यशवंत पवार यांच्या स्वलिखित अहिराणी कवितेला प्रथम क्रमांक मिळाल्याने त्यांना सर्वज्ञ फाउंडेशनच्या आध्यक्षा डॉ, सुचिता पाटील व उपाध्यक्ष ओमकार देशमुख यांनी त्यांची जळगाव जिल्ह्यातून पुरस्कारासाठी निवड करून दिनांक २१ रोजी शिवाजी पार्क दादर मुंबई इथे आयोजित भव्य कार्यक्रमात श्रीराम दांडेकर कार्यकारी उपाध्यक्ष हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन संचालनालय अशोक बागवे गीतकार साहित्यिक या प्रमुख मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आई विद्यादेवी पाटील माजी पालकमंत्री सतीश पाटील जिल्हा परिषद मा.सदस्य रोहन पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.