सावधान.. मोबाईल बँकिंग, UPI वापरताय ? हा मालवेअर तुमचे बँक खाते करेल रिकामे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. तसेच बदलत्या काळानुसार आता जग कॅशलेस व्यवहाराकडे (Cashless transactions) वळताय. आर्थिक व्यवहारासाठी डिजिटल पेमेंटचा (Digital payment) मोठा वापर होतोय. मात्र सावधान… एका गोष्टीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होवू शकते.

जर तुम्ही युपीआय (UPI), नेटबँकिंग (Netbanking) किंवा मोबाईल बँकिंग (Mobile Banking) वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. अलीकडेच फोनमध्ये Xenomorph बँकिंग अ‍ॅप मालवेअर सक्रिय झाले आहे.

हा धोकादायक मालवेअर या महिन्याच्या सुरुवातीला एका सुरक्षा संशोधकाने शोधला होता. संशोधकाच्या म्हणण्यानुसार, हा मालवेअर आतापर्यंत सुमारे 50 हजार अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या बँकिंग अ‍ॅपमध्ये शिरला आहे.

धोकादायक xenomorphs 

तज्ञांच्या मते, हा मालवेअर बँकिंग अ‍ॅप्समध्ये प्रवेश करून तुमचे लॉगिन तपशील चोरतो. याशिवाय बँकिंगशी संबंधित मेसेजही या मालवेअरद्वारे वाचले जातात. हा मालवेअर मेसेज आणि नोटिफिकेशनमध्ये व्यत्ययही आणू शकतो. हा मालवेअर आपोआप अपडेट देखील होऊ शकतो. म्हणजेच प्रत्येक अपडेटवर त्याची क्षमता आणि गुणवत्तेमध्ये वाढ होईल. बँकिंग व्यतिरिक्त, हे तुमचे वैयक्तिक तपशील देखील चोरू शकते. एकदा हा मालवेअर फोनमध्ये शिरला की, बँकिंग व्यतिरिक्त हा तुमच्या संपूर्ण फोवर देखील नियंत्रण मिळवतो.

मालवेअरने या देशांमध्ये घातली धुडगूस

या मालवेअरने अनेक देशांतील लोकांचे नुकसान केले आहे. एका अहवालानुसार, आतापर्यंत स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम आणि इटलीमध्ये हा मालवेअर पसरला आहे.

कशी काळजी घ्यावी

  • कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. ईमेलमध्ये स्पॅम आणि संशयास्पद मेल दिसल्यास ते उघडणेही टाळा.
  • तुमच्या  स्मार्टफोनमध्ये एक चांगला अँटीव्हायरस अ‍ॅप इन्स्टॉल करा.
  • फोन वारंवार हँग होत असल्यास, फोन हॅक झाल्याचे इतर कोणतेही संकेत मिळत असल्यास किंवा मालवेअर आले असल्यास, तो त्वरित फॉरमॅट करा.
  • कोणतीही शंका असल्यास फोनवर नेटबँकिंग आणि UPI सारखे अ‍ॅप्स वापरणे टाळा.

Leave A Reply

Your email address will not be published.