Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    अपघात

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    महाराष्ट्राची वाघीण म्हणून ओळख : थेट किल्ल्यावरून उडी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 4, 2026No Comments593 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना घडली. कुस्तीच्या खेळाडू असलेल्या अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा मृत्यू झाला. अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि एका मुलीवरती धाराशिव येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    अश्विनी पौळ या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूने असे धक्कादायक पाऊल का उचलले असा सवाल केला जात आहे. आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट दरीत त्यांनी उडी घेतली. या घटनेने खळबळ उडाली.

    अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुळ्या मुलींपैकी असलेली वीर गंभीर जखमी आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. अश्विनी मनोहर पौळ या कुस्तीपटू होत्या. महाराष्ट्राची वाघीण म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी उचललेल्या या पावलाने हळहळ व्यक्त केली जात आहे. पण अश्विनी यांनी हे पाऊल नक्की का उचलले असा सवाही उपस्थित होत आहे.

    क्रीडा विश्वाला धक्का बसलाय. त्यातच अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केले. नवरा आणि सासरच्या मंडळींच्या मानसिक त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने जीवनाचा शेवट केल्याचे अश्विनी यांच्या वडिलांनी सांगितले. पोलिस या घटनेची चाैकशी करत आहेत. अश्विनी याच नाही तर त्यांचे वडील, भाऊ, आई आणि बहिणी देखील कुस्तीपटू आहेत.

    वडिलांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी मुलींना तालिम दिली. तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक, गुरुदासपूर आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावले सुवर्ण पदक. दरम्यान, या घटनेनंतर नळदुर्ग किल्ल्यातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपळी बुरुजासारख्या धोकादायक ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे का? नाही असा सवाल उपस्थित होत आहे.नळदुर्ग पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif