Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बोरी नदी पुलावरून पडून कामगाराचा मृत्यू
    अपघात

    बोरी नदी पुलावरून पडून कामगाराचा मृत्यू

    रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम करताना अपघात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026No Comments229 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील बोरी नदीवरील रेल्वे पुलावर रुळांच्या दुरुस्तीचे काम करत असताना पुलावरून नदीत पडल्याने एका रेल्वे कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. उदय शिवाजी बोरसे (रा. नंदुरबार) असे मृत कामगाराचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, उदय शिवाजी बोरसे हे रेल्वे विभागातील कामगार असून, अमळनेर परिसरातील बोरी नदीवरील रेल्वे पुलावर रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दि. २८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते पुलावर दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक तोल जाऊन पुलावरून खाली नदीत पडले. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सहकाऱ्यांनी व उपस्थितांनी तातडीने उदय शिवाजी बोरसे यांना नदीतून बाहेर काढून उपचारासाठी नर्मदा फाउंडेशन येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे रेल्वे कामगारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    दरम्यान, या घटनेची माहिती स्टेशन प्रबंधक विकास पाटील यांनी अमळनेर पोलिसांना दिली. त्यानंतर सुनील गव्हाणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत. कामगार पुलावर दुरुस्तीचे काम करत असताना नेमकी कोणत्या परिस्थितीत नदीत पडले, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026

    देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif