Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    ताज्या बातम्या

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 8, 2026No Comments105 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे : पूर्व तयारीचा घेतला आढावा

    जळगाव – युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी जिल्ह्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येत असून, शाळा-महाविद्यालयांपासून गाव-वॉर्ड पातळीपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी माय भारत क्लब, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच सामाजिक व आध्यात्मिक संस्थांनी सहभागी होऊन सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
    भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाच्या नशामुक्त युवा विकसित भारत या राष्ट्रव्यापी अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करीष्मा नायर, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रोटेक्ट, प्रिव्हेंट, रिकव्हर या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे. पालक संवाद, समुपदेशन, डिजिटल डिटॉक्स, करिअर मार्गदर्शन, क्रीडा, योग, पारंपरिक खेळ, वाचन चळवळ, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन आदी उपक्रमांद्वारे युवकांना सकारात्मक पर्याय उपलब्ध करून दिले जातील. दर महिन्याला चार रविवार विविध उपक्रमांसाठी निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या रविवारी तज्ज्ञ मार्गदर्शन व जीवनकौशल्य प्रशिक्षण, दुसऱ्या रविवारी क्रीडा, योग, सायकल रॅली, ट्रेकिंग व सांस्कृतिक कार्यक्रम, तिसऱ्या रविवारी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान व सामाजिक उपक्रम, तर चौथ्या रविवारी युवक महोत्सव, स्पर्धा, पुरस्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
    जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. संशयित बंद कारखाने, कुरिअर व टपाल व्यवस्था, प्रवासी बस तसेच इतर ठिकाणी तपासणी केली जात असून, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शेवटपर्यंत माग काढण्यावर पोलिसांचा भर आहे. मिशन राईज उपक्रमातून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्पपरिणामांबाबत जनजागृती केली जाणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी करावयाच्या आवश्यक कृतीचे सादरीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif