एरंडोल नगरपालिकेच्या विषय समित्यांवर महिलाराज!
सभापतीपदी महिलांची बिनविरोध निवड : महिला सक्षमीकरणाचा अनोखा निर्णय
एरंडोल : येथे नगरपालिकेच्या स्थायी समितीसह इतर विषय समित्यांच्या निवडीसाठी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेची विशेष सभा न.पा.सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, उपाध्यक्षा सुनिता माळी, गटनेते प्रा.मनोज पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व विषय समित्यांच्या सभापती पदी नगरसेविकांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व नगरसेवकांनी महिला सदस्यांकडे विषय समित्यांच्या सभापती पदाची सुत्रे सुपुर्द करून महिला सक्षमीकरणाचा अभिनव निर्णय घेतला. सर्व समित्यांच्या सभापती पदी महिला विराजमान झाल्यामुळे महिला नेतृत्वाला नवीन झळाळी प्राप्त होणार आहे.
स्थायी समिती – डॉ.नरेंद्र धुडकू ठाकूर, सुनिता रूपेश माळी, कमल गोपाल पाटील, सत्यभामाबाई माधव पाटील, शारदा अतुल मराठे, मनकरनाबाई चैत्राम चौधरी, पौर्णिमा महेश देवरे. महिला व बालकल्याण समिती – पौर्णिमा महेश देवरे (सभापती), कल्पना मनोज पाटील, छाया आनंद दाभाडे, आरती अतुल महाजन, डॉ.गितांजली नरेंद्र ठाकूर, नजमाबी सईद कागजी. सार्वजनिक बांधकाम समिती कमल गोपाल पाटील (सभापती), छाया आनंद दाभाडे, कल्पना मनोज पाटील, अमोल किशोर तंबोली, डॉ.गितांजली नरेंद्र ठाकूर, इम्रानअली जाफरअली सय्यद.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सत्यभामाबाई माधव पाटील (सभापती), प्रा.मनोज नथ्थू पाटील, कल्पना मनोज पाटील, जिजाबाई वसंत पाटील, रविंद्र संतोष महाजन, इम्रानअली जाफरअली सय्यद.
स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती शारदा अतुल मराठे (सभापती), प्रा.मनोज नथ्थू पाटील, नय्यमखां दलशेरखां पठाण, कृष्णा प्रल्हाद ओतारी, भारती मनोज गुर्जर, शबानाबी नुरूद्दीन सय्यद. पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती मनकरनाबाई चैत्राम चौधरी (सभापती), प्रा.मनोज नथ्थू पाटील, अनिल केशव महाजन, आरती अतुल महाजन, नितेश कैलास चौधरी, नजमाबी सईद कागजी.
नियोजन आणि विकास समिती सुनिता रूपेश माळी (सभापती), प्रा.मनोज नथ्थू पाटील, अनिल केशव महाजन, प्रशांत दिलीप महाजन, नितेश कैलास चौधरी, शबानाबी नुरूद्दीन सय्यद.
यावेळी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपाध्यक्षा सुनिता माळी, गटनेते प्रा.मनोज पाटील व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या हस्ते सभापतींचे स्वागत व सत्कार करण्यात आला. निवड प्रक्रिया पार पाडण्याकामी प्रशासकीय अधिकारी हितेश जोगी, कार्यालय अधीक्षक एस.आर.ठाकूर,आर.के.पाटील,शरद राजपूत,महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.