Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लांबवले!
    गुन्हे वार्ता

    गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लांबवले!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 3, 2026No Comments156 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर

    मुक्ताईनगर बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत (मिनी मंगळसूत्र) चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रावेर तालुक्यातील कांडवेल येथील रहिवासी सौ. संगीता राजकुमार पाटील (वय 38, व्यवसाय- गृहिणी) या दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर बसस्थानकावर आल्या होत्या. तेथून प्रवासासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीची संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चलाखीने चोरून नेली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या पोतीत 3 ग्रॅम वजनाचे मणी-मंगळसूत्र असून त्याची अंदाजे किंमत 9 हजार रुपये आहे.

    आपल्या गळ्यातील दागिना गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर संगीता पाटील यांनी तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4.22 वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 305/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif