धक्कादायक; जामनेरात कोल्ड्रिंक्स पाजून महिलेवर अत्याचार

0

जामनेर : ३० वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्स पाजून तीन जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाहीतर अत्याचार करतांनाचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी तीस वर्षीय महिलेला सुमारे एक वर्षापूर्वी गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक या तीन जणांनी कोल्ड्रिंक्स पाजून जामनेर ते भुसावळ दरम्यानच्या एका गावाजवळ असलेल्या एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केला होता. एवढेच नव्हे तर अनैसर्गिक अत्याचार करतांना मनीषा हिने व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबत पीडित महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोविंद जगन तवर श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे हे करीत आवेत दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली.

Leave A Reply

Your email address will not be published.