Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    गुन्हे वार्ता

    जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार

    मौलवीचा प्रताप उघड : पळून जाण्याची तयारी, मात्र...
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 17, 2026No Comments586 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आजार बरा करून देण्याच्या आणि तंत्र-मंत्र आणि जंतर-मंतरच्या नावाखाली 30 वर्षीय महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथून समोर आला आहे. या दर्ग्यातील मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याच्यावर महिलेने गंभीर आरोप केले आहेत. उपचाराच्या नावाखाली महिलेचे व्हिडिओ कॉलद्वारे चित्रीकरण केल्याचा, तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ तयार केल्याचा गंभीर आरोप महिलेने केले आहे.

    हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख (50) याला भायखळा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेत अटक केली.

    पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. तिला आजाराचा त्रास असल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी वऱ्हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथील मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. हा मौलाना या दर्ग्यात 2013 पासून काम पाहत आहे.

    नातेवाईकांनी सांगितल्यानुसार महिला 2024 मध्ये उपचारासाठी दर्ग्यात गेली होती. आजार बरा करून देण्याचे आश्वासन देत आरोपीने महिलेला जंतर-मंतर आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली विविध विधी करण्यास सुरुवात केली. महिलेचे बांधलेले केस सोडणे, हात धरले, लिंबू कापणे आणि इतर कथित अघोरी विधी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचाराच्या नावाखाली महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप असून, महिलेने विरोध केला असता उपचारासाठी हा विधी आवश्यक असल्याचे आरोपीने सांगितल्याचा दावा आहे.

    एवढेच नव्हे तर आरोपीने महिलेला उपचार करण्यासाठी रात्री दर्ग्यात बोलावून घेत विविध विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला. उपचाराच्या नावाखाली व्हिडिओ कॉलद्वारे महिलेचे चित्रीकरण करण्यात आले. तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराचेही व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे आरोपीने महिलेला सांगित तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आरोपीने फोनवरून सांगितल्यानंतर महिला घाबरली. त्यानंतर तिने भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

    पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 मधील कलम 3, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66 ई आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी मौलवी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत भायखळा रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif