गोंडगाव येथे विहीरीत पडून महिलेचा मृत्यू

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील गोंडगाव येथे मुस्लिम कब्रस्तान जवळील विहिरीत पडून पाण्यात बुडुन २१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सदर घटना दि. १८ रोजी सकाळी ६ वाजेपुर्वी घडली. गोंडगाव गावातील मुस्लिम कब्रस्थान जवळील विहिरीत येथील रहिवासी दिपाली शुभम साळुंखे (वय २१) या महिलेचा विहीरीत पडून विहीरीतील पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत गोंडगाव पोलीस पाटील वाल्मीक दगडू मोरे यांच्या खबरीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय नलावडे हे करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी चाळीसगाव पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय नलावडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.