holiday gifts 30 and under how do you add a gift card to your amazon account nestle toll house cookie printable coupons walking dead gifts etsy
Thursday, December 1, 2022

डांभुर्णी; महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

 

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी अर्चना राजेंद्र कोळी वय 33 यांनी काल बुधवार दि.27 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, सुरत चे माहेर असलेल्या अर्चना कोळी लग्न झाल्यापासून डांभुर्णी येथे 16-17 वर्षांपासून राहत होती. सर्व परिवार व कुंटूंबाची जबाबदारी त्या खुशालीने पार पाडत होत्या. सासरी ती सुखी समाधानी आनंदी होती. मात्र तीने अचानक घेतलेल्या टोकाच्या भूमिकेने हे कुटुंब उघडे पडले आहे. काल दुपारी अर्चना ही घरात एकटी असतांना तिचे सासरे व पती हे कामानिमित्त बाहेर गेले होते तर, त्यांची मुले शाळेत गेलेले असतांना घरात गळफास घेत तीने आपली जीवनयात्रा संपवली. दुपारी मुलगा शाळेतुन घरी परतल्यावर दरवाजा उघडताच छताला लटकलेल्या आईचा मृतदेह पाहून त्याने एकच आक्रोश केला आणि रडत रडत वडिलांचा शोध घेतला. घटने बाबतीत माहिती मिळताच विवाहितेचा पती राजेंद्र बळीराम कोळी यांने घराकडे धाव घेतली. बुधवारचा बाजार असल्याने घटनेची चर्चा पसरताच लोकांनी एकच गर्दी केली.

घटनेची माहिती पो.पाटील यांना कळताच त्यांनी घटनेस्थळी धाव घेत अर्चना कोळी यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले व तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. तिच्या पाश्च्यात पती, सासरे, लहान दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटने बाबतीत यावल पोलिसात राजेंद्र कोळी यांचे जाबजबाब घेतले असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील कार्यवाही व तपास पो.नि.दिलीप भागवत यांचे मार्गदर्शनाखाली बीट हवालदार हे.कॉ.अजीज शेख व नरेंद्र बगुले हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या