पारोळा
लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील स्वामीनारायण नगर येथील रहिवासी वायरमन दिनेश श्यामकुमार पाटील (वय ३२) याच्या म्हसवे शिवारातील नगाव रस्त्यावर विजेच्या खांबावर काम करीत असताना अचानक विज प्रवाहा सुरू झाल्याने अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत वायरमनचे शव पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.