Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोरट्यांचा धुमाकूळ :वाईन शॉपचे दुकान फोडून १० लाखांचे दारू बॉक्स आणि रोकड लंपास
    गुन्हे वार्ता

    चोरट्यांचा धुमाकूळ :वाईन शॉपचे दुकान फोडून १० लाखांचे दारू बॉक्स आणि रोकड लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2025Updated:April 23, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोरट्यांचा धुमाकूळ :वाईन शॉपचे दुकान फोडून १० लाखांचे दारू बॉक्स आणि रोकड लंपास

    जळगाव, :चोरट्यांनी डल्ला मारून एका वाईन शॉपमधील १२६ खोके आणि ७० हजारांची रोकड लंपास केल्याचा प्रकार आज सकाळी २३ रोजी उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ईच्छादेवी चौफुलीजवळील अशोका लिकर गॅलरी या मद्यविक्री दुकानावर हि घटना घडली .

    भुसावळ येथील रहिवासी अशोकशेठ नागराणी यांचे जळगाव शहरातील ईच्छादेवी चौफुलीजवळ महामार्गालगत दारू विक्रीचे दुकान आहे. दररोजप्रमाणे मंगळवारी रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी परतले होते. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकवून दुकानात प्रवेश केला.

    दारू आणि रोकडीसह डिव्हिआरही चोरीला

    चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख रक्कम आणि १२६ बॉक्स देशी-विदेशी महागडी दारू चोरली आहे. एकूण चोरीची किंमत सुमारे १० लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डिव्हिआर यंत्रही चोरले, ज्यामुळे तपास अधिक कठीण झाला आहे.

    घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जिल्हापेठ पोलीस आणि एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीमने ठसे व अन्य पुरावे गोळा केले असून, अधिक तपास सुरू आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली चोरी ही पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरली आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif