अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या संशयिताला अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई

0

अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या संशयिताला अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर शहरातील मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी अवैध मद्यसाठा वाहतूक करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. कारवाईदरम्यान ५८,००० रुपये किंमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अमळनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एका बॅजो रिक्षातून (MH 19 BJ 5019) अवैधरीत्या दारू वाहतूक केली जात आहे. त्यानुसार, १६ मार्च रोजी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

पोलिसांनी रिक्षा थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळला. याप्रकरणी रिक्षाचालक धनराज अशोक चौधरी (वय ४६, रा. अमळगाव, ता. अमळनेर) याला अटक करण्यात आली आहे. तसेच, प्रवीण काशिनाथ चौधरी याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक व पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सुरू असून अमळनेर पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संभाव्य आरोपींची चौकशी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.