Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»दुकानाबाहेर दारू पिल्यास वाईन शॉपचा परवाना रद्द होणार!
    जळगाव जिल्हा

    दुकानाबाहेर दारू पिल्यास वाईन शॉपचा परवाना रद्द होणार!

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा थेट इशारा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 20, 2026No Comments87 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहर आणि परिसरात वाईन शॉप तसेच दारू दुकानांच्या समोरील मोकळ्या जागेत, रस्त्यावर आणि परिसरात बेकायदेशीरपणे उघड्यावर दारू पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक, महिला, लहान मुले आणि पादचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील वाईन शॉप आणि दारू दुकान चालकांना कायदेशीर नोटीस बजावत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

    या नोटीसमध्ये पोलीस प्रशासनाने दुकान चालकांना या तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. वाईन शॉपच्या बाजूला किंवा परिसरात कोणत्याही व्यक्तीला मद्यप्राशन करण्यासाठी जागा, खुर्च्या, पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थ (चखणा) किंवा इतर कोणतीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सुविधा दुकान चालक किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून पुरवता येणार नाही. दुकानातून मद्य खरेदी करून कोणीही व्यक्ती बाहेर मोकळ्या जागेत अथवा रस्त्यावर दारू पिणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी दुकानदाराची असेल. याबाबत दुकानाच्या दर्शनी भागात फलक लावणे बंधनकारक आहे. दुकानाबाहेर कोणी मद्यप्राशन करताना आढळल्यास त्याला तात्काळ तिथून हटवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल. गरज पडल्यास यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेता येईल.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाईन शॉपचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची शिफारस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली जाईल. तसेच नियम मोडणारे दुकानदार आणि मद्यपींवर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल. या मोहिमेमुळे उघड्यावर दारू पिणाऱ्यांना आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या दुकानदारांना मोठा चाप बसणार आहे.

    jalgaon Jalgaon Police License Superintendent of Police Shrikant Dhivare Wine Shop
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif