लोकशाही संपादकीय लेख

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात जाणे, यावर अधूनमधून चर्चा होत असते. त्याला शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे देखील कारणीभूत आहेत. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जावे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असे आमदार बच्चू कडू हे वारंवार बोलत असतात. त्यालाच उत्तर देताना भाजपचे नेते म्हणतात की, 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर एक विषय असाही येतो की, देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची शिफारस मुख्यमंत्री होण्यासाठी करतील, असे बोलले जाते. आता आणखीन एक नवा ट्विस्ट. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये घर वापसी चालली आहे. ते म्हणतात की, चंद्रकांत बावनकुळे मुख्यमंत्री होतील ना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांची शिफारस करतील, असे वक्तव्य करून जोरदार हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे यांचा विनोद तावडे यांनी भेट घेतली. त्यातच या भाजप घरवापसीला जोर चढला आहे. परंतु खडसे हे म्हणतात की, माजी आता भाजपमध्ये येण्याची बिलकुल इच्छा नाही. भले माझे कार्यकर्ते म्हणतात, मी भाजपमध्ये प्रवेश करावा; पण मी प्रवेश नाही केला तरी माझे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील. परंतु मी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहणार आहे. शरद पवारांसोबतच मी राहणार आहे, हे त्यांनी आज स्पष्टपणे सांगून टाकले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या दोन सप्टेंबरच्या वाढदिवसानिमित्त निमंत्रण देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, आमची ही भेट माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाली होती. त्यांना मी निमंत्रण दिले. ते वाढदिवसाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. यावेळी खासदार संजय राऊत सुद्धा तेथे हजर होते. एकंदरीत नाथाभाऊंच्या घर वापसीवरून परत एकदा वादळ उठले आहे. बघूया काय होते ते…


