Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»रखरखत्या उन्हात आंदोलन करणार! : जरांगे पाटील
    महाराष्ट्र

    रखरखत्या उन्हात आंदोलन करणार! : जरांगे पाटील

    उष्माघातामुळे काही झाल्यास सरकार जबाबदार!
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 28, 2026No Comments130 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कठोर उपोषण करायचं आहे, उन्हात बाज टाकून मी उपोषण करणार, जे होईल ते होईल उष्माघातामुळे बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळे जाईल, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपली उपोषणाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. कठोर निर्णय घेणार असून ३० मे रोजी उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे म्हणालेत.

    सरकारला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून वेळ दिला होता, त्या काळात सातारा गॅझेटिअरवर जीआर काढला गेला नाही, असं जरांगे म्हणालेत. आता मेलो तरी चालेल, मला मराठा समाजाला रिझल्ट द्यायचा आहे. उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर सरकारकडून फोन येतील, पण फोन येऊन उपयोग नाही, त्याचा परिणाम काही होत नाही. म मला चर्चा नकोय, आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे, असं जरांगे म्हणालेत.

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आणि सातारा गॅझिटिअर लागू न झाल्यानं मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी अंतरावली सराटी येथे पत्रकार परिषद घेतील. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर आगपाखड केली.

    सरकारला 10 महिने वेळ दिला पण अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे आपला नाईलाज आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही, आपल्या लेकराला, समाजाला न्याय मिळत नसेल तर आपण कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. मी सीमारेषेवर आलोय. मी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आहे. मात्र उपोषण आंदोलन करण्याचा ठिकाणात बदल करण्यात आला असून आता आमरण उपोषण सावलीत, मंडपात करणार नाही. मला आता अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे, रखरखत्या उन्हात हे उपोषण बाज टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार, असं उपोषण आपण करणार असल्याचं जरांगे म्हणालेत.

    मग जे काही होईल ते होईल. उष्माघाताने बळी गेला तर देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं बळी जाईल. त्यासाठी सरकार जबाबदार असेन. कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय. तर आपण आपली कदर का करायची, असं जरांगे म्हणाले.

    आमरण उपोषण कुठेही होईल, रानात होईल, कडक उन्हात ते उपोषण होईल यावर मी ठाम आहे. मग किती वेदना होतील याचा विचार करायचा नाही हे ठरवलंय. सारखी सारखी उपोषणं करुन जीवाला वेदना होत आहेत. एकदा तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडेल किंवा माझा,असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif