Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»अडीच वर्षाच्या आधीच किशोर आप्पा मंत्री होणार?
    संपादकीय

    अडीच वर्षाच्या आधीच किशोर आप्पा मंत्री होणार?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 29, 2026Updated:April 29, 2026No Comments559 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख 

    पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची आमदारकीची तिसरी टर्म. 2019 साली अगदी काठावर निवडून आलेले किशोर आप्पा 2024 च्या निवडणुकीत दणदणीत मतांनी विजयी झाले. 2019 मध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते तेच 2020 साली अमोल शिंदे, दिलीप वाघ या उमेदवारांव्यक्तिरिक्त वैशाली सूर्यवंशी या उमेदवार ज्यादा होत्या. विरोधी पक्षाचा सर्व उमेदवारांना चारीमुंड्या चीत करून किशोर आप्पा विजयी झाले. अमोल शिंदे आणि वैशाली सूर्यवंशी यांचा भ्रमनिरास झाला आणि ते मोठ्या फरकाने पराभूत झाले. परंतु किशोरअप्पा पाटलांनी शिवसेनेत चांगलीच बाजी मारली, परंतु मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. गुलाबराव पाटलांनी बाजी मारली आणि दुसऱ्या दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्याचे ते पालकमंत्री झाले. मंत्रिमंडळ स्थापन झाले तेव्हा फारच राडा झाला. त्यामुळे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येतील, असे जाहीर केले. त्यामुळे अडीच वर्षाला अद्याप एक वर्ष एक महिना बाकी असताना मध्येच शिवसेनेचे काही मंत्री वगळणार आणि नवीन मंत्र्यांना स्थान मिळणार अशा चर्चांना उधाण आले. त्यातच जळगाव जिल्ह्याचा विचार करता मंत्रीपदात बदल होईल आणि ती माळ किशोर आप्पा पाटील यांच्या गळ्यात पडणार, अशी एक चर्चा सुरू झाली. त्याला कारणही तसेच आहे. किशोराप्पा पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजे नगरपालिका निवडणुकीत वेगळीच भूमिका घेतली. विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुती बरोबर युती केली, पण अमोल शिंदे हे भाजपचे असताना अपक्ष उमेदवारी लढवली. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला. तेव्हा ‘नगरपालिका निवडणुकीत मला युती करायची नाही. ताकाला जायचे आणि लोटा लपवायचा असला प्रकार मला जमणार नाही.’ अशीत ठोस भूमिका घेतली. महायुतीतर्फे युती व्हावी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी खूप प्रयत्न केले, पण किशोर आप्पा ‘मला युती करायची नाही’ म्हणत हट्टला पेटले. म्हणून पाचोरा आणि भडगाव नगरपालिकांची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. पाचोरा व भडगाव नगरपालिकेत निर्विवाद बहुमत त्यांनी एकट्याच्या जोरावर प्राप्त केले. महायुतीचा पराभव झाला. अशा प्रकारे पाचोरा आणि भडगाव नगरपालिकांमध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त केल्यावर दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत प्राप्त करून भाजपचा सुपडा साफ केला. त्यामुळे किशोर आप्पा पाटलांची ठाकूरकी राहिली. पक्षाजवळ त्यांची किंमत वाढली. प्रत्येक जण किशोर आप्पांच्या निर्णयाचे कौतुक करायला लागले. त्यातून मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशा चर्चा सुरू झाल्या. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात वर्णी लागणार होती, परंतु परिस्थिती अशी काही झाली की मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्रांना डच्चू मिळणार आणि त्यात किशोर आप्पांची वर्णे लागणार. आता वाट बघितली जाते आहे की मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होतो त्याची. किती मंत्र्यांना वगळणार आणि नवीन मंत्र्यांना घेणार? त्यात किशोर आप्पांच्या मंत्रिपदाची शक्यता आहे. सध्या विधान परिषद निवडणूक आहेत. त्या पार पडल्या की नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात किशोर आप्पा पाटलांचा नंबर लागणार हे निश्चित आहे. याबाबत किशोर आप्पांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मीही तुमच्यासारखाच ऐकतो आहे. मंत्रीपद मिळाले तर कुणाला नको आहे. ते हवेच असणार, पण मला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. त्यापैकी मंत्रिपदही न मागता मिळेल याचा मला विश्वास आहे..”

    याबाबतीत पालकमंत्री गुलाबराव पाटलांना विचारले असता ते म्हणाले, ‘प्रत्येकाला मंत्रिपद मागण्याचा अधिकार आहे. शेवटी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील.’ ही गुलाबराव पाटलांची सूचक प्रतिक्रिया होय. गुलाबराव पाटलांनी पडती बाजू म्हणजे त्यांच्या धरणगाव शहरात धरणगाव नगरपालिकेत नगराध्यक्षपदी त्यांच्या म्हणजे पक्षाच्या उमेदवाराला पाडले आणि तेथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार लिलाबाई चौधरी या मोठ्या मतांनी विजयी झाल्या. आपल्या जळगाव ग्रामीण मतदार संघात धरणगाव नगरपालिकेत गुलाबराव पाटलांना महायुती बरोबर युती केली होती, तरी त्यांच्या पक्षाचा उमेदवार पडला हे विशेष होय. नगरपालिकेत महायुती झाली होती तेथे भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाला. एकंदरीत दोन्ही नगरपालिकेत गुलाबराव पाटलांच्या वाट्याला काही आले नाही. शेवटी धरणगाव पालिकेत विकासाच्या मुद्द्यावर तडजोड घडवून आणली आणि नगराध्यक्षांना सत्तेचे पूर्ण सहकार्य करण्याच्या आश्वासनावर काम फत्ते झाले. हा सेट बॅक गुलाबराव पाटलांना नडणारा आहे. म्हणून त्यांची मंत्रिमंडळातील उचल बांगडी करून त्यांना पक्ष संघटनेत स्थान देण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय आहे, असे कळते. त्यामुळे अडीच वर्षाच्या आधीच गुलाबराव पाटलांचे मंत्रिपद जाणार आणि ते मंत्रिपद किशोर आप्पांच्या गळ्यात पडणार असे एकूण चित्र दिसते आहे. याबाबतीत किशोर आप्पा पाटील यांच्याकडून कसलीही घाई नाही. शांतपणे याचा विचार करत आहेत. “मीही तुमच्याकडूनच ऐकले की मला मंत्रिपद मिळणार म्हणून” या अशा शालिनीतेमुळे किशोर आप्पा पाटील यांनी मोठी उंची गाठली आहे. ते संघटनेचे जोरदार काम करत आहेत. माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेत आल्यावर त्यांची बाजू घेऊन त्यांचा प्रचार ते जोरदार करीत आहेत. उन्मेष पाटलांच्या सभेत आमदार मंगेश चव्हाण यांचे नाव न घेता चांगलेच तोंडसुख घेतले. उन्मेष पाटलांचा पाटलांची थैली घेऊन फिरणारा किती दगाबाज आहे हे दिसून येते. परंतु आता ते दिवस राहिले नाहीत. म्हणून शिवसेनेची बाजू मोठ्या हिमतीने ते मांडत आहेत हे विशेष होय..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!

    September 16, 2026

    गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!

    September 15, 2026

    लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!

    September 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif