Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भाजपा देणार 25 टक्के सीटींग नगरसेवकांना डच्चू?
    जळगाव

    भाजपा देणार 25 टक्के सीटींग नगरसेवकांना डच्चू?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2025No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    दीपक कुलकर्णी

    जळगाव

    आगामी काळात होवू घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्ष किमान 25 टक्के सीटिंग नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभागातील आणि पक्षीय कामात सक्रियता आणि निष्क्रियता असे निकष लावून हे निर्णय घेतले जाणार आहेत. ज्या महिला नगरसेविकांनी गेल्या पाच वर्षात स्वत: सक्रीय राहण्याऐवजी प्रभागातील काम आपल्या पती किंवा नातेवाईकांवर सोपवून दिले होते अशा महिला नगरसेविकांनाही डच्चू दिले जाणार असल्याची माहिती आहे. एक व्यक्ती एक पद या नियमानुसार एका घरात एकच उमेदवारी देण्यात येणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. जळगाव महानगरपालिकेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर यक्षप्रश्न उभे राहिले आहे. उमेदवारी देतांना श्रेष्ठींना निकषाचा आधार घ्यावा लागणार आहे.

    यंदा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपने विविध प्रभागांमध्ये गोपनीय सर्व्हे करून घेतले आहेत. त्यामध्ये कोण प्रबळ उमेदवार राहू शकतो?, विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो?, पक्षात नवीन आलेल्या पैकी कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते अशा मुद्द्यांवरही सर्व्हेमध्ये पक्षाने माहिती गोळा केली आहे.  महानगरपालिकांमध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने यंदा महिला उमेदवार देताना पक्षाने नेत्यांच्या किंवा राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुंबातील महिलांना सरसकट संधी देण्याऐवजी संबंधित महिला उमेदवाराची लोकप्रियता आणि पक्षासाठी केलेले काम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभागातील सक्रियता असे निकष लावण्यात येणार आहेत.

    संघ पदाधिकाऱ्यांचे मत घेणार?

    भारतीय जनता पक्ष महापालिकेसाठी उमेदवारी देतात प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी संघांच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरली होती. अतिआत्मविश्वासात हातची जागा जावू नये यासाठी भाजपाकडून समाजातील प्रतिष्ठीत नागरीक, संघाचे पदाधिकारी यांचे मत विचारात घेणार आहे. रविवारी जाहीर होणाऱ्या नगरपालिका निकालांमध्ये भाजपला कशा प्रकारे यश मिळते त्यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif