Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; चार वासरांचा फडशा
    ताज्या बातम्या

    कुसुंब्यात वन्यप्राण्यांची दहशत; चार वासरांचा फडशा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 20, 2026No Comments380 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गोशाळेसमोरील येथील घटना : वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

    जळगाव : तालुक्यातील कुसुंब्यात वन्यप्राण्यांनी एका फार्महाऊसमधील चार वासरांचा दोन रात्रीत हल्ला करून फडशा पाडला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामे केले आहे. या फार्महाऊसवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.
    जळगाव-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील अहिंसा तीर्थ गोशाळेसमोर अनंत पाटील यांचे फार्महाऊस आहे. यात गेल्या 20-22 वर्षांपासून गायी आणि वासरे बांधलेली असतात. शनिवारी सकाळी साडेसातला अनंत पाटील गायीचे दूध घेण्यासाठी फार्महाऊसमध्ये गेले असता तीन वासरे मृत आढळली. यात 2 वर्षाचा एक, 18 महिन्याचा एक व तिसरा 12 महिन्याच्या वासराचा समावेश आहे. ही माहिती त्यांनी पोलिस पाटील हल्ल्यानंतर आता अनंत पाटील यांनी फार्महाऊसमधील 6 गायी व 1 वासरू गावात नेऊन बांधले आहे. तसेच फार्महाऊसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. दरम्यान, रात्रीच्या सुमाराला वासरांवर हल्ला करणारा वन्य प्राणी तडस किंवा कोल्हा असण्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. सुरुवातीला सर्वांनी कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तवली. मात्र, हा वन्य प्राण्यांचा हल्ला असल्याची खात्री असल्याने अनंत पाटील यांनी शवविच्छेदनाची मागणी केली. त्यानंतर जळगावहून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले. रविवारी सकाळी अनंत पाटील हे फार्महाऊसवर गेल्यावर त्यांना पुन्हा 2 वर्षाच्या वासराचे पोट फाडून अर्धवट खाल्लेले आढळले. वन विभागाला पुन्हा कळवल्यावर त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी वनपाल उमाकांत कोळी, मेहरूणचे वनरक्षक अजय रायसिंगे, उमाळ्याचे वनरक्षक हरीश थोरात, पशुधन पर्यवेक्षक डॉ. योगेश पाटील हे उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif