Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पत्नीला चार तास ‘कोंबडा’ बनवून ठेवत बेदम मारहाण
    गुन्हे वार्ता

    पत्नीला चार तास ‘कोंबडा’ बनवून ठेवत बेदम मारहाण

    तलवारीने मारण्याची, ॲसिड हल्ला करण्याची धमकी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 1, 2026No Comments464 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईतील चेंबुरमधून संतापजनक बातमी समोर आली आहे. एका महिलेला तिच्या पतीने धमकावत अमानुषरीत्या मारहाण केली. धक्कादायक म्हणजे या महिलेला ४ तासांसाठी कोंबडा बनण्याची शिक्षा दिली. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरसीएफ पोलिसांनी ३० वर्षीय अरबाज अन्वरअली सय्यदला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाजला दारू आणि गांजाचे व्यसन असल्याने त्याचे पत्नीसोबत वारंवार वाद होत होते. तसेच त्याला डिसेंबर २०२५ पासून १२ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे त्याची २५ वर्षीय पत्नी मुलांसह माहेरी राहत होती. गुरुवारी अरबाज पत्नीच्या माहेरी गेला आणि तिला जीन्स पॅन्ट तसेच अत्तराची बाटली खरेदी करून देण्याचे आश्वासन देत चेंबूर येथील घरी घेऊन आला. मात्र घरी पोचताच त्याने पत्नीशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर हाताने, पायाने आणि पट्ट्याने तिला बेदम मारहाण केली.

    एवढ्यावरच न थांबता तलवारीने मारून टाकण्याची तसेच अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पत्नीला तब्बल चार तास ‘कोंबडा’ बनवून ठेवले. तसेच तिच्या आई-वडिलांना आणि मुलालाही ठार मारण्याची धमकी दिली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत तिला घरातच कोंडून ठेवण्यात आले होते. दरम्यान, आरोपीला डुलकी लागल्याची संधी साधून संबंधित महिलेने रात्री नऊच्या सुमारास घरातून पळ काढला आणि थेट आपल्या आई-वडिलांच्या घरी पोचली. ही बाब समजताच संतप्त झालेल्या अरबाजने तिच्या माहेरी धाव घेतली. तेथेही त्याने पत्नीला मारहाण केली आणि चाकूने हल्ला केला.

    घटनास्थळी उपस्थित नागरिकांना आरोपीने चाकू दाखवून धमकावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. जखमी महिलेवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif