लोकशाही न्यूज नेटवर्क
लिओनार्डो दा विंची यांनी तयार केलेली मोनालिसा हे जगातील सर्वात प्रसिद्ध चित्रांपैकी एक आहे. हे पेंटिंग पाहण्यासाठी दररोज लाखो लोक पॅरिसमधील लूवर संग्रहालयात जातात. दि. 21 ऑगस्ट 1911 रोजी जेव्हा मोनालिसा बेपत्ता झाली, तेव्हा ते पेंटिंग चोरीला गेल्याचे दिवसभर कुणाच्याही लक्षात आले नाही. या पेंटिंगच्या हास्याचे रहस्य आजही कायम आहे.
काल्पनिक लँडस्केपसमोर बसलेल्या विषयाचे चित्रण करणारी मोनालिसा ही पहिली पेंटिंग आहे. कलाविश्वात सुरुवातीपासूनच चित्रकलेचे कौतुक होत आले आहे. पण तिच्या हसण्याचे वेगळेच वेड आहे. ती प्रत्येक व्यक्तीला स्वतःकडे आकर्षित करते. विशेष म्हणजे लिओनार्डो दा विंचीला मोनालिसाचे फक्त ओठ तयार करण्यासाठी 12 वर्षे लागली. इटलीत जन्मलेल्या लिओनार्डो दा विंचीने 1503 मध्ये मोनालिसाचे चित्र काढण्यास सुरुवात केली. ते 14 वर्षांनी 1517 मध्ये पूर्ण झाले. लिओनार्डो दा विंचीने हे चित्र पूर्ण केले नाही, असेही म्हटले जाते. 1519 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या सहकाऱ्यांनी ते पूर्ण केले.
मोनालिसाला इतका वेळ का लागला? यावर काही लोक म्हणतात की दा विंची एकाच वेळी अनेक गोष्टी करत असे. दा विंची सुरू करणे, थांबवणे आणि रीस्टार्ट करणे, काम अपूर्ण सोडणे आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्यासाठी ओळखले जात असे. चित्रकार असण्याबरोबरच ते शिल्पकार, वास्तुविशारद, संगीतकार, अभियंता आणि वैज्ञानिकही होते. मोनालिसाच्या ओठांकडे पाहून अनेकांना प्रश्न पडतो ती हसतेय की व्यंग्यपूर्ण हसतेय.
लिओनार्डोचे चरित्रकार ज्योर्जिओ वसारी यांनी लिहिले आहे की, लिओनार्डोने चित्र काढलेस, तेव्हा मादाम लिसाला आनंदी ठेवण्यासाठी तो गायक आणि संगीतकारांना बोलावत असे, जेणेकरुन तिच्या चेहऱ्यावर चित्रकार त्याच्या पेंटिंगमध्ये दाखविलेले दुःख दाखवू नये. पण काही लोकांचा असा विश्वास आहे की ती दुःखी आहे.
एका जपानी डॉक्टरने पेंटिंगबाबत सांगितले की, मोनालिसाच्या हसण्याचे रहस्य तिच्या वरच्या जबड्यातील दोन तुटलेल्या दातांमध्ये आहे. यामुळे, तिचा वरचा ओठ एका बाजूला दाबलेला दिसतो, ज्याला आपण नकळत मोनालिसाचे स्मित हास्य समजतो. काही शास्त्रज्ञांच्या मते, मोनालिसाचे रहस्यमय स्मित हास् डोळ्याचा कोणता भाग प्रथम पाहतो यावर अवलंबून आहे. त्याचा विश्वास आहे की आपले डोळे मेंदूला मिश्रित सिग्नल पाठवत आहेत. डॉ. लुईस मार्टिनेझ म्हणतात की मोनालिसाचे स्मित रेटिनातील कोणत्या पेशी प्रतिमा घेतात आणि प्रतिमा कोणत्या वाहिनीद्वारे मेंदूकडे जाते यावर अवलंबून असते.
21 ऑगस्ट 1911 रोजी मोनालिसाची पेंटिंग चोरीला गेली होती. यातील एक चोर संग्रहालयातील कर्मचारी होता. चोरांचा असा विश्वास होता की लिओनार्डो दा विंची इटालियन असल्याने पेंटिंग इटलीमध्ये असावी. त्याचवेळी, मोनालिसाचे पेंटिंग कुठेतरी कलाकृतीसाठी नेले असावे, असे संग्रहालयाच्या रक्षकाला वाटले. दुसऱ्या दिवशीही पेंटिंग न दिसल्याने गार्डला संशय आला. त्यांनी लोकांकडे चौकशी केली आणि पेंटिंग चोरीला गेल्याचे समोर आले. पेंटिंगचा सर्वत्र शोध सुरू झाला. पेटिंग सापडणाऱ्याला मोठे बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली. पोलिसांनी मोनालिसाच्या पेंटिंगचे 6 हजार पोस्टर्स लोकांमध्ये वाटले. पण दोन वर्षे या चित्रकलेबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यानंतर एका आर्ट डीलरच्या मदतीने अखेर पोलिसांनी चोरट्याला पकडले. जेव्हा पेंटिंग परत आली, तेव्हा लाखो लोक लूवर संग्रहालयात पोहोचले. एका आकडेवारीनुसार, मोनालिसा पाहण्यासाठी दोन दिवसांत एक लाखाहून अधिक लोक संग्रहालयात आले.