लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीत मुलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी प्रथमच शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेस पक्षाने आत्मपरिक्षण कराव, एवढी दयनीय परिस्थीती का झाली? मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा निवडून आल्या, पृथ्वीराज बाबा आले आणि 82 च्या 42 केल्या आणि आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 वर आणल्या हा इतिहास आहे. असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला आहे.
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात मी साईंच्या दर्शनाने करत आलो आहे. गेल्या 50 वर्षांपासून माझे आई-वडील आणि आमचं संपूर्ण कुटुंब साईच्या दर्शनासाठी येत असत. साईबाबा आमच्या कुटुंबाचे गुरू आहेत. बाबांचा आशिर्वाद घेऊन कामाची सुरुवात करायची ही आमची प्रथा आणि परंपरा आहे. निवडणुका झाल्या माझी कन्या श्रीजया विधानसभेत चांगल्या मताधिक्याने निवडून आली हे बाबांमुळेच शक्य झालय. त्यामुळे बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसला अवघ्या 16 जागाच मिळाल्या यावर बोलताना अशोच चव्हाण यांनी नान पटोले यांना जोरदार टोला लगावला आहे. काँग्रेस पक्षानं आत्मपरिक्षण करावं एवढी दयनीय अवस्था का झाली? राज्याचा प्रमुख असताना 82 जागा निवडून आल्या, पृथ्वीराज बाबा आले आणि 82 च्या 42 केल्या आणि आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 वर आणल्या हा इतिहास आहे. त्यांनी परिस्थितीचं आकलन करावं, मी काय इथे त्यांना सल्ला द्यायला आलो नाही, पक्षात जुने जानते नेते आहेत असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ते आपल्या भाजप प्रवेशावर बोलताना म्हणाले की, मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीनं मी 14 वर्ष वनवास भोगला त्यामुळे मला भावना व्यक्त कराव्या लागल्या. पण मला कोणाबद्दल वैयक्तीक आकस नाही. मी बाबांचा भक्त असल्यानं विनाकारण कोणावर टीका करावी हा माझा हेतू नाही. रागाच्या भरात काही बोललो असेल तर ते मनावर घेऊ नये, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.